किमान तापमान : 31.54° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 6.94 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.07°C - 32.99°C
sky is clear28.48°C - 30.68°C
sky is clear28.18°C - 30.48°C
sky is clear28°C - 30.32°C
sky is clear27.95°C - 29.94°C
sky is clear27.81°C - 30.39°C
sky is clearइस्लामाबाद, (२९ ऑगस्ट) – तोशखाना प्रकरणात सुटकेचा आदेश देताच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सिफर प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मंगळवारी सुरुवातीला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत इम्रान खान यांच्या सुटकेचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत पीटीआय पक्षाने हा संविधानाचा विजय असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी अलिकडेच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी अनवर उल हक काळजीवाहू पंतप्रधान झाले. त्यानंतर इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात दिलासा मिळाला. अनवर उल हक हे बलुचिस्तान अवामी पार्टीचे नेते असून, ते या वर्षाच्या अखेरीस होणार्या निवडणुकींपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान असतील. शाहबाझ शरीफ यांनी ९ ऑगस्ट रोजी नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस केली होती.
इम्रान खान यांना सध्या अटॉक तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मात्र, आपल्याला रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात हलवण्यात यावे, अशी त्यांची इच्छा आहे. अटॉक येथील तुरुंगात कीटकांमुळे इम्रान खान अस्वस्थ असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. या व्यतिरिक्त निवडणूक लढवण्यास त्यांना पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालयाने तोशखाना प्रकरणात त्यांना दोषी ठरवल्यानंतर या निर्णयाला त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.