|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 32.74° C

कमाल तापमान : 36.24° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 35 %

वायू वेग : 9.56 Mps

स्थळ : Mumbai, IN

36.24° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.18°C - 37.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.97°C - 32.73°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.47°C - 32.01°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.81°C - 30.92°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.36°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.12°C - 30.03°C

sky is clear
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » हिजाब न घालणाऱ्या महिलांना मृतदेहांच्या साफसफाईची शिक्षा

हिजाब न घालणाऱ्या महिलांना मृतदेहांच्या साफसफाईची शिक्षा

– इराणचा अजब कारभार,
तेहरान, (०७ ऑगस्ट) – इराण सरकार हिजाब परिधान करण्यावरून आक्रमक झाले आहे. त्यामुळे महिलांवर प्रतिबंध घालण्यात येत असून, हिजाब परिधान न करणार्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा सुनावण्यात येत आहे. ज्या महिला हिजाबच्या नियमांचे उल्लंघन करेल, त्या महिलांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
इराण सरकार हिजाब न घालणार्या महिलांना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवत आहे. महिला जितक्या जास्त नियमांचे उल्लंघन करतील, तितकीच सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करीत आहे. इराणची अभिनेत्री अफसाना बेयेगनलाही दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली तसेच दर आठवड्याला समुपदेशनासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अभिनेत्रीने यापूर्वी हिजाब न घालता तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
याआधी तेहरानच्या न्यायालयाने हिजाब नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका महिलेला शवागारातील मृतदेह स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली होती. पीडित महिला हिजाब परिधान न करता कार चालवताना पकडली गेली होती. पोलिसांच्या छळामुळे महसा अमिनी नावाच्या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये देशव्यापी निदर्शने झाली होती. या दरम्यान मोठ्या संख्येने महिलांनी हिजाबविरोधात निदर्शने केली होती. महसा हिच्या मृत्यूनंतर निषेध म्हणून मोठ्या सं‘येने महिलांनी हिजाब घालणे बंद केले आहे. त्यामुळेच इराण सरकार याविरोधात कठोर भूमिका घेत आहे.

Posted by : | on : 7 Aug 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g