|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 30.69° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 52 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.69° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » हुमायूंची कबर हिंदूंचे आध्यात्मिक ठिकाण: ब्रिटिश वृत्तपत्राने तोडले अकलेचे तारे

हुमायूंची कबर हिंदूंचे आध्यात्मिक ठिकाण: ब्रिटिश वृत्तपत्राने तोडले अकलेचे तारे

लंडन, (०५ सप्टेंबर) – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या भारतात आगमनाबाबत ब्रिटीश मीडिया सातत्याने कव्हरेज करत आहे. दरम्यान, एका आघाडीच्या ब्रिटीश वृत्तपत्रातील एका लेखाने वाद निर्माण केला आहे. एका वृत्तपत्राने आपल्या एका अहवालात हुमायूंच्या कबरीला ’हिंदूंसाठी अध्यात्मिक ठिकाण’ म्हटले आहे, त्यामुळे लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या अहवालात असे लिहिले आहे की, ’पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या भारत भेटीदरम्यान हिंदूंचे आध्यात्मिक ठिकाण असलेल्या हुमायूंच्या समाधीला भेट देतील अशी अपेक्षा आहे.
हा लेख गेल्या आठवड्यात येथील एका स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. लेखात पुढील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुनक आणि स्टारमर यांच्यातील स्पर्धेबद्दल बोलले गेले. स्टारमर हे मजूर पक्षाचे नेते आहेत आणि सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. यात प्रसिद्ध झाले आहे की, ऋषी सुनक आठवड्याच्या शेवटी भारतात पोहोचतील जिथे ते जागतिक नेत्यांच्या जी२० बैठकीत सहभागी होतील. आशियाई वंशाच्या ब्रिटनच्या पहिल्या पंतप्रधानांचे जोरदार स्वागत होईल, अशी अपेक्षा आहे. लेखात सुनक हे हुमायूंच्या मकबर्‍याला दिलेल्या भेटीचा संदर्भ देत लिहिले की, ’सुनक पत्नी अक्षता मूर्ती या भारतीय अब्जाधीशांची मुलगी हिच्यासोबत हुमायूंच्या समाधीला भेट देणे आणि तेथे फोटो काढणे अपेक्षित आहे. हुमायूंचा मकबरा हे हिंदूंसाठी एक आध्यात्मिक ठिकाण आहे आणि जोडप्यांना येथे फोटो काढणे खूप आवडते.
मात्र हा लेख प्रकाशित झाल्यानंतर, भारतातील सोशल मीडिया वापरकर्ते संतप्त झाले असून मुस्लिम शासक हुमायूंच्या मकबर्‍याला हिंदूंसाठी आध्यात्मिक स्थान कसे म्हणता येईल असा प्रश्न विचारू लागले. पाश्चिमात्य मीडियाची खिल्ली उडवत युजर्स लिहित आहेत कीएवढे , सुनक भारतात कधीपासून एवढे लोकप्रिय झाले की गर्दी त्यांना घेरले. तर दुसर्‍या युजरने लिहिले, ’हा कसला लेख आहे? भारतात लोक ऋषी सुनकला घेरतील…. आणि मग हुमायूंची समाधी हिंदूंसाठी आध्यात्मिक केव्हापासून बनली? चुकीचे तथ्य…निरुपयोगी अनुमान…ब्रिटिश माध्यमे अशी वृत्तपत्रे प्रकाशित करतात का? जी-२० हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा समूह आहे ज्यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि इतर देशांचा समावेश आहे. यावेळी भारत जी-२० चे आयोजन करत आहे ज्याची शिखर परिषद ९ ते १० सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होत आहे.

Posted by : | on : 5 Sep 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g