|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.07° C

कमाल तापमान : 33.02° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 71 %

वायू वेग : 5.56 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.02° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.33°C - 31.9°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.86°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.78°C - 30.34°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.76°C - 30.2°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.59°C - 30.45°C

overcast clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » १५० गायींना गोळ्या घालण्याचे सरकारचे आदेश

१५० गायींना गोळ्या घालण्याचे सरकारचे आदेश

मेक्सिको, (१८ फेब्रुवारी ) – अमेरिकेतील मेक्सिको सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात गायींना गोळ्या घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. अमेरिकेच्या वनविभागाने सांगितले की, गायी येथील शेतीचे नुकसान करतात त्याचबरोबर पादचार्‍यांसाठी धोकादायक बनल्या आहेत. यासाठी हेलिकॉप्टर शूटर्स कामाला लावण्यात आले आहेत. यादरम्यान, १५० गायींना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत, ज्या पर्वत आणि दर्‍यांमधील लुप्तप्राय प्रजातींच्या परिसंस्थेचा नाश करत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
स्थानिक वृत्तानुसार, हवेतून गोळी झाडून प्राण्यांना निर्दयीपणे मारणे हा क्रूर प्रकार असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. वन पर्यवेक्षक कॅमिली होवेस यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे असलेल्या इतर वन्यजीव आणि लोकांचे संरक्षण करणे हा देखील एक मानवी मार्ग आहे, परंतु त्यांना नष्ट करण्याच्या मार्गावर ती प्रश्न उपस्थित करते. गिला जंगलातील वन्य गायी जंगलात येणार्‍या लोकांसाठी धोक्याच्या आहेत. कारण गायी त्यांच्यावर हल्ला करतात आणि नदीचे पात्र त्याचबरोबर झर्‍यांना हानी पोहोचवतात. अमेरिकन वेस्टमध्ये जंगली डुकरांना हवेत मारणे सामान्य आहे. मात्र, अशा प्रकारे गुरे मारण्यावरून वाद निर्माण होऊ शकतात. एका पशुपालकाने सांगितले की हेलिकॉप्टर शूटर्स गायींचा पाठलाग करतात आणि त्यांना गोळ्या घालतात. यामुळे गायी अतिशय वेदनादायकरीत्या मरतात.
न्यू मेक्सिको केटल ग्रोअर्स असोसिएशन चे अध्यक्ष लॉरेन पॅटरसन म्हणाले की, प्राधिकरण दीर्घकालीन उपाय शोधत नाही आणि केवळ अल्पकालीन उपाय शोधत आहे. गुरेढोरे हे अन्नाचा एक चांगला स्रोत आहे असे त्यांचे मत आहे. प्राधिकरणाने असे कारनामे थांबवले नाही तर कायदेशीर कारवाई करू, असे संघटनेने म्हटले आहे. त्याचवेळी, पर्यावरण आणि येथे उपस्थित असलेल्या प्राण्यांसाठी धोकादायक असलेल्या गिलाच्या जंगलातून सर्व गुरेढोरे नष्ट व्हावेत, अशी इच्छा असलेल्या पर्यावरणवाद्यांसाठी प्राधिकरणाचा आदेश योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

Posted by : | on : 18 Feb 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g