|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.04° C

कमाल तापमान : 29.14° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 4.66 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.04° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

29.94°C - 33.01°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.93°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.76°C - 32.34°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.89°C - 30.45°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.53°C - 29.91°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.37°C - 30.22°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » पानसरे दाम्पत्याची प्रकृती स्थिर

पानसरे दाम्पत्याची प्रकृती स्थिर

=पाच संशयितांना अटक=
govind_pansareकोल्हापूर, [१७ फेब्रुवारी] – भाकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी दिली. सोमवारी सकाळी हे दाम्पत्य मोकळ्या हवेत फिरून घरी परतत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.
पथकराविरोधात व्यापक मोहीम राबविणारे प्रख्यात कामगार नेते गोविंद पानसरे यांची प्रकृती अजूनही धोक्याबाहेर नसली, तरी ती स्थिर आहे, अशी माहिती येथील खाजगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास दामले यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
नऊ डॉक्टरांच्या पथकाने गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी दिवसभरात तीन शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या शरीरातील सर्व गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यांचा रक्तस्रावही आता नियंत्रणात आला आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तब्बल आठ तासपर्यंत चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर म्हणाले. त्यांच्या फुप्फुसाची हानी झाली असल्याने त्यांना आम्ही कृत्रिम श्‍वसनप्रणालीवर ठेवले आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाबही स्थिर असून, किडनीचे कार्यही सुरळीत आहे, असे दामले यांनी सांगितले.

Posted by : | on : 18 Feb 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g