|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.97° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 66 %

वायू वेग : 3.65 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.79°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.79°C - 30.02°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.76°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28°C - 29.92°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.13°C - 30.82°C

broken clouds
Home » महाराष्ट्र » उद्धव ठाकरे गटाला ‘सुप्रीम’ झटका

उद्धव ठाकरे गटाला ‘सुप्रीम’ झटका

-तातडीच्या सुनावणीस नकार,
नवी दिल्ली, (०१ ऑगस्ट) – एकनाथ शिंदे यांचा पक्षच खरी शिवसेना असल्याचे स्पष्ट करून या पक्षाला धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह प्रदान करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणार्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. ठाकरे गटाचे वकील अमित तिवारी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनापुढे आज ही याचिका सादर करताना, यावर तातडीने सुनावणी करण्यात यावी, अशी विनंती केली होती. ती नाकारताना सरन्यायाधीश म्हणाले की, जम्मू-काश्मिरातील कलम ३७० निष्प‘भ करण्याप्रकरणी दाखल याचिकांवर सध्या घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. ती पूर्ण होऊ द्या. तोपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करा.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध करणारी आणि आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांची निष्कि‘यता अशा दोन प्रकरणांत याचिका दाखल केली आहे. परंतु, या दोन्ही प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यास न्यायालायने नकार दिला. शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देऊन निवडणूक आयोगाने चूक केली, असा युक्तिवाद ठाकरे यांच्या वकिलाने केला. कुठलेही ठोस पुरावे आणि सादरीकरण नसताना, आयोगाने शिवसेनेचा ताबा एकनाथ शिंदे यांना द्यायला नको होता, असेही त्यांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने या प्रकरणी तत्काळ सुनावणीस नकार दिला.

Posted by : | on : 1 Aug 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g