|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.23° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home » महाराष्ट्र » उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘पर्यावरण विघ्नहर्ता’ स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘पर्यावरण विघ्नहर्ता’ स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन

मुंबई, (०७ सप्टेंबर) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ‘पर्यावरण विघ्नहर्ता -२०२३’ या पर्यावरणस्नेही राज्यस्तरीय श्रीगणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन नुकतेच मंत्रालयात झाले. ही स्पर्धा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पार पडले. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून, ती सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन गटांमध्ये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नुकतेच केलेले आहे.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या कार्यात कलात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी गणेशभक्तांना केले. पंचमहाभूते फाउंडेशनने या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक रूपात शेकडो वृक्ष देण्यात येतील. मात्र, यावर्षी याच वृक्षांची लागवड करून मिनी फॉरेस्ट उभारण्याचा मानस आहे.
पंचमहाभूते फाउंडेशन ही एनजीओ या संपूर्ण चराचरात समाविष्ट असलेल्या जमीन, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभुतांच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. वृक्ष लागवड, मिनी फॉरेस्ट, नेल फ्री ट्री, पर्क्युलेशन पिट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासोबतच नो बाथ डे, टू मिनिट शॉवर, पर्यावरण विघ्नहर्ता व से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल यासारख्या अभिनव कल्पना सातत्याने राबवत आहे. सोल्युशन्स फॉर पोल्युशन हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि संस्था यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पंचमहाभूते विशेष प्रयत्नशील आहे. देशातील प्रथम पर्यावरणस्नेही राज्य अशी ओळख महाराष्ट्राला लाभावी, हे पंचमहाभूते फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे. फाउंडेशनची घोडदौड पाहता त्यांचे हे उद्दिष्ट लवकरच साकारेल, यात शंकाच नाही.

Posted by : | on : 7 Sep 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g