किमान तापमान : 30.23° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 1.77 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.12°C - 30.99°C
sky is clear28.81°C - 31.87°C
sky is clear28.58°C - 31.35°C
few clouds28.47°C - 30.26°C
few clouds28.66°C - 30.17°C
broken clouds28.35°C - 29.99°C
broken cloudsमुंबई, (०४ सप्टेंबर) – एका एअर होस्टेसचा मृतदेह येथील एका अपार्टमेंटमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर मुंबई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत, एका व्यक्तीला ताब्यात घेतले. रूपल ओग्रे असे हत्या झालेल्या एअर होस्टेसचे नाव आहे. ती मूळची छत्तीसगडची आहे. एअर इंडियाच्या प्रशिक्षणासाठी ती एप्रिल महिन्यात मुंबईत आली होती. अंधेरीतील मरोळ येथील एन. जी. कॉम्पलेक्स येथील सदनिकेत रविवारी रात्री तिचा मृतदेह आढळला.
पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. रूपलच्या कुटुंबीयांनी तिला कॉल केला होता. मात्र, तिने उत्तर न दिल्याने त्यांनी तिच्या मित्रांकडे चौकशी केली आणि सदनिकेवर जाण्यास सांगितले. त्यांनी दार ठोठावले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी दार तोडले असता, आत तिचा मृतदेह आढळला, असे अधिकार्याने सांगितले.