|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.23° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home » महाराष्ट्र » जीआरमध्ये दुरुस्ती केल्यानंतरच उपोषण मागे घेणार

जीआरमध्ये दुरुस्ती केल्यानंतरच उपोषण मागे घेणार

-मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली भूमिका,
मुंबई, (०७ सप्टेंबर) – महाराष्ट्र सरकारने मराठा-कुणबी जातीच्या जात प्रमाणपत्राबाबत जीआर जारी केला आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी जीआरमध्ये दुरुस्ती सुचवली आहे. जीआरमध्ये वंशावळीचा उल्लेख काढण्यात यावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा मागण्या जरांगे यांनी केल्या. दुरुस्त केलेला जीआर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने मराठा-कुणबी जातीच्या जात प्रमाणपत्राबाबत जीआर जारी केला. ज्यांच्याकडे निजामकालीन वंशावळीचे कुणबी जातीची प्रमाणपत्रे असतील त्यांना मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र दिले जाईल, असे या जीआरमध्ये स्पष्ट म्हटले आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर सरकारने हा जीआर काढला. सरकारने हा जीआर काढल्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले. त्यांनी जरांगे यांच्यासमोर जीआर वाचून दाखवला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपरोक्त भूमिका घेतली.
मनोज जरांगे यांनी जीआरमध्ये दुरुस्ती सुचवल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी दुरुस्ती सुचवण्यासाठी मुंबईत चर्चेसाठी यावे लागेल, असे सांगितले. त्यावर मनोज जरांगे यांनी आमचे शिष्टमंडळ मुंबईत चर्चेसाठी येईल, असे जाहीर केले. आपल्याला या जीआरची माहिती बुधवारी रात्रीच मिळाली होती तसेच आपण आज सकाळीदेखील जीआरमधून वंशावळी असा उल्लेख काढण्यात यावा, अशी मागणी केली होती. पण, त्यानंतरही गुरुवारी काढण्यात आलेल्या जीआरमध्ये तसा उल्लेख आहे. त्यामुळे दुरुस्त केलेला जीआर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांना सरकारचे पत्र
मनोज जरांगे यांना राज्य सरकारने पत्र देखील पाठवले आहे. या पत्रात सरकारने मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. शासनाने ७ सप्टेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाची प्रत सोबत जोडली आहे. तरी आपणास उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे, असे सरकारने या पत्रात म्हटले आहे.
सणासुदीच्या काळात नवी दिल्लीहून धावणार्या बहुतांश गाड्या खचाखच भरलेल्या असतात. पुष्कळ प्रवासी कन्फर्म तिकिटांसाठी स्टेशनवर फेर्या मारत असतात. याचा फायदा घेत दलाल त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून मनमानी पैसे उकळतात. यानंतर तो रेल्वे अधिकार्यांशी संगनमत करून खासदाराच्या नावावर चुकीची कागदपत्रे टाकून कोट्यातून रिझर्व्हेशन मिळवतो. आता त्याचे सत्य जाणून घेण्यासाठी रेल्वेने ही मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी धावत्या ट्रेनमध्ये कन्फर्म सीटवर बसून प्रवास करणार्या प्रवाशांची चौकशी करतील, जेणेकरून कोटा लागू करण्यामागे पैशांचा व्यवहार आहे का, हे स्पष्ट होईल, अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. यासोबतच तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशांचा तपशील आणि फॉर्मचा अहवाल दररोज विभाग कार्यालयात पाठविण्यास सांगण्यात आले आहे.
प्रवासादरम्यान मोबाईल नंबर, नाव, पीएनआर नंबर, सीट नंबर, ज्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला कोटा (एचओ) लागू करण्यात आला आहे. ते कोठून कोठपर्यंत, तसेच कोट्याची माहिती, संबंधित अधिकार्याशी प्रवाशाचे नाते काय आहे, याची माहिती द्यावी लागेल, असे संबंधित रेल्वे अधिकार्यांनी सांगितले. याशिवाय प्रवाशांच्या ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतर एक फॉर्म भरला जात आहे. अनेक दिवसांपासून गाड्यांमध्ये ही मोहीम सुरू आहे.

 

Posted by : | on : 7 Sep 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g