|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.37° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 3.59 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.74°C - 30.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.15°C - 30.49°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

28°C - 30.33°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.64°C - 29.82°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.9°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.28°C - 30.44°C

broken clouds
Home » मराठवाडा » परळी वैद्यनाथ मंदिर उडवण्याची धमकी

परळी वैद्यनाथ मंदिर उडवण्याची धमकी

५० लाखांच्या खंडणीची मागणी,
बीड, २७ नोव्हेंबर – बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सचा स्फोट घडवून उडविण्याची धमकी देणारे पत्र मंदिर प्रशासन समितीला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ मंदिर संस्थानकडे भरपूर पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवून देऊ, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पत्रात लिहिले आहे की, आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्‍वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ रक्कम देणगी रूपाने मिळाली आहे.
मी फार मोठा गुंड आणि माफिया असून, मला ५० लाख रुपयांची तातडीची गरज आहे. हे पत्र मिळताच दिलेल्या पत्त्यावर रक्कम पोहोचवा, अन्यथा वैद्यनाथ मंदिर उडवेन. या धमकीनंतर मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हे पत्र व्यंकट गुरूपद मठपती या नावाने आणि रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्‍वर नगर, विष्णुपुरी, नांदेड या पत्त्यावरून आले होते. परळी वैद्यनाथ देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीर्घकाळापासून बंद असलेले हे मंदिर आता निर्बंध शिथिल झाल्याने खुले करण्यात आले आहे.

Posted by : | on : 27 Nov 2021
Filed under : मराठवाडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g