Posted by वृत्तभारती
Sunday, December 17th, 2023
छ. संभाजीनगर, (१७ डिसेंबर) – जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचविणार्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत होणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र प्रस्तुत आणि मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाऊंडेशनद्वारा आयोजित हा महोत्सव राहणार आहे. आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट...
17 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, October 26th, 2023
तुळजापूर, (२५ ऑक्टोबर) – माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त दिनांक २६ ते २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे ९ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर तामलवाडी टोल प्लाजा येथे तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि मुख्य...
26 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 16th, 2023
लातूर, (१६ फेब्रुवारी ) – शहरातील विवेकानंद चौक परिसरात बुधवारी सकाळी १०.३० ते ११.४५ या वेळेत जमिनीच्या आतील गूढ आवाज ऐकू आले. लोकांना वाटले की हा भूकंपाचा आवाज असू शकतो आणि भूकंप होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जरी अधिकारी म्हणतात की कोणत्याही भूकंपाच्या हालचालीचा अहवाल नाही. यानंतर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क केले. जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील तसेच औराद शहाजनी आणि आशिव जिल्ह्यातील भूकंप निरीक्षण केंद्रांकडून माहिती...
16 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 9th, 2023
उस्मानाबाद, (९ फेब्रुवारी ) – येथील ऊर्समध्ये वळू उधळल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेत १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद शहरातील हजरत ‘वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या ऊर्सच्या धार्मिक कार्यक‘माच्यावेळी अचानक वळू उधळला आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. पहाटे घडलेल्या घटनेत १४ भाविक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास...
9 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 27th, 2021
५० लाखांच्या खंडणीची मागणी, बीड, २७ नोव्हेंबर – बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सचा स्फोट घडवून उडविण्याची धमकी देणारे पत्र मंदिर प्रशासन समितीला प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ मंदिर संस्थानकडे भरपूर पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवून देऊ, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
27 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, April 5th, 2021
मुंबई, ४ एप्रिल – जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज रविवारी राहत्या घरी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अलिकडेच त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता-करता त्यांनी खलनायिका म्हणूनही आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली होती. शशिकला जावळकर लग्नानंतर शशिकला ओमप्रकाश सैगल बनल्या होत्या. १९४७ च्या जुगनू चित्रपटात दिलीपकुमार यांच्या बहिणीची भूमिका त्यांनी साकारली होती. यानंतर काम मिळविण्यासाठी त्यांना...
5 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, July 25th, 2015
=मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात= लातूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, वेळप्रसंगी कर्ज काढण्याचीही राज्य शासनाची तयारी आहे, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील टंचाई भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. मराठवाड्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्याची सुरूवात मुख्यमंत्र्यांनी आज लातूर येथून केली. आष्टी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी निवेदने स्वीकारुन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पीक-पाण्याची परिस्थिती चिंताजनक असल्याची शासनास जाणीव आहे. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी...
25 Jul 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, July 23rd, 2015
धाराशिव : जून महिन्यात सरासरीच्या अधिक पाऊस पडला. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे जुलैचा अर्धा महिना संपला तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजाच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस आणखी वाढ होतांना दिसत आहे. मृग नक्षत्रातील पावसावर विसंबून धाराशिव जिल्ह्यातील १,९५,७०० हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी झाली आहे़. आगामी आठवड्यात पाऊस न झाल्यास सुमारे १,१८,८०० क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावणार असल्याचे आपत्कालीन पीक नियोजन आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. आजही जिल्ह्यात पाणीटंचाईची...
23 Jul 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 17th, 2015
नांदेड, [१६ फेब्रुवारी] – महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड या प्रतिष्ठेच्या विधानसभा जागेवर भाजपाने आज सोमवारी दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपाचे उमेदवार तुषार राठोड यांनी आपल्या वडिलांचा हा मतदारसंघ कायम राखला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुखेड मतदारसंघात भाजपाचे गोविंद राठोड ७३ हजाराच्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते. मात्र, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक घेणे अनिवार्य झाले होते. भाजपाने गोविंद राठोड यांचे पुत्र तुषार राठोड यांना...
17 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 20th, 2014
लामजना, [१९ डिसेंबर] – लातूर – उस्मानाबाद जिल्हयांतील सीमेवरील किल्लारीसह लामजना, खरोसा, मंगरूळ, गुबाळ,लिंबाळा बाणेगावसह परिसरातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९.४२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाच्या भीतीने आणि घरातील भांडयांच्या आवाजामुळे घरांतील लोक रस्त्यावर धावत आले,सर्वत्र धावपळ सुरू झाली. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाक्षी संपर्क साधला असता, भूकंप मापक यंत्रावर नोंद झाली नसल्यामुळे हा भूकंप नसून गूढ आवाज असल्याचे उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले. दरम्यान, उमरगा तालुक्यातील अनेक...
20 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 12th, 2014
=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती= परळी, [१२ डिसेंबर] – दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता होणार आहे. के्रंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाधिस्थळ परळी तालुक्यातील पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर परिसरात आहे. याचठिकाणी गोपीनाथगड स्मारक उभारले जाणार आहे. यावेळी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज व राष्ट्रसंत भय्यू महाराज...
12 Dec 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 21st, 2014
=मुलींनी राखला वडिलांचा गड= मुंबई, [१९ ऑक्टोबर] – दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांचा अनुक्रमे बीड आणि परळी हा गड यशस्वीपणे कायम राखला आहे. विशेषत: प्रीतम मुंडे यांनी तर बीड लोकसभेची जागा विक्रमी ६.९२ लाखांच्या फरकाने जिंकली आहे. पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभेची जागा आणि प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभेची जागा लढविली. पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उभा असलेला आपला चुलत भाऊ...
21 Oct 2014 / No Comment / Read More »