किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, ४ एप्रिल – जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज रविवारी राहत्या घरी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अलिकडेच त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते.
प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता-करता त्यांनी खलनायिका म्हणूनही आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली होती. शशिकला जावळकर लग्नानंतर शशिकला ओमप्रकाश सैगल बनल्या होत्या. १९४७ च्या जुगनू चित्रपटात दिलीपकुमार यांच्या बहिणीची भूमिका त्यांनी साकारली होती. यानंतर काम मिळविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ मध्ये आरती चित्रपटात त्यांना नकारात्मक भूमिका मिळाली. या भूमिकेमुळे त्यांनी चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. मात्र, दिग्दर्शकांनी शशिकला यांची समजूत काढून भूमिकेसाठी तयार केले. या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. फिल्मफेअरसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर अशा चित्रपटात खलनायिकेच्या भूमिका त्यांनी साकारल्या. २००७ साली सरकारने शशिकला यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. २००९ मध्ये त्यांना व्ही. शांताराम जीवनव्रती पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.