किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.84°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलपरळी, २२ नोव्हेंबर – बारा ज्योतिर्लिंगांमध्ये परळीचे वैजनाथ पाचवे आहे, अशी ग्वाही संकेश्वर पीठाधीश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी येथील धर्मसभेत दिली. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगांमध्ये परळीचे वैजनाथ आहे अथवा नाही, हा वाद संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्योतिर्लिंगाची महती सांगणार्या श्लोकात बारा ज्योतिर्लिंगांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाबाबत वाद आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकीचे पाचवे ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथ येथील नसून, उत्तर भारतातील असावे, असा दावा करण्यात येतो. मात्र, या वादावर आता पडण्याची शक्यता आहे.
वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासून ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे. त्यामुळे हा कुणाच्या मान्यतेचा विषयच नाही. मात्र, या मुद्यावरून होणारा संभ्रम दूर करण्यासाठी काशीच्या विद्वतसभेत या मुद्याची पुनर्मांडणी करण्यात येईल, अशी ग्वाही संकेश्वर पीठाधीश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी परळीतील धर्मसभेत दिली.
संकेश्वर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू अभिनव विद्यानृसिंह स्वामी महाराज, दंडीस्वामी अमृताश्रम स्वामी महाराज, हिमाचल प्रदेश येथील जयदेव आश्रम स्वामी महाराज, स्वामी मधुरानंदजी आदी संत-महंत परळी शहरात धर्मसभेसाठी आले होते. या दौर्यादरम्यान त्यांनी ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथचे दर्शन घेतले. त्याशिवाय नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन आध्यात्मिक मार्गदर्शन व हितगुज केले.
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, भगवान महादेव ज्या ठिकाणी स्वत: प्रकट झाले, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहेत. देशभरात बारा ठिकाणे आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू या राज्यांमध्येही ज्योतिर्लिंग आहेत. परळी-वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाच्या दाव्यावरून मतभिन्नता आहे. या दाव्या-प्रतिदाव्याच्या पृष्ठभूमीवर संकेश्वर पीठाधीश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी वैजनाथ येथील शिव मंदिर हेच ज्योतिर्लिंग असल्याचे वक्तव्य महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.