किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, २२ नोव्हेंबर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती, विधान परिषदेच्या सहा सदस्यांसाठी होणारी निवडणूक या सार्या पृष्ठभूमीवर येत्या ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्याचे तसेच ते मुंबईत घेण्याच्या हालचीलींना वेग आला आहे.
हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला होत असते. परंतु, मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेता हे अधिवेशन मुंबईतच होण्याची चिन्हे आहेत. या आठवड्यात तसा निर्णय सरकार व प्रशासन घेणार आहे. जुलैमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताना, हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, अधिवेशनाला १५ दिवस राहिले असताना अद्याप अधिवेशनाच्या तयारीची हालचाल दिसत नाही. अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते. त्या बैठकीचा अजूनही पत्ता नाही.
मुख्यमंत्री ठाकरे यांना अद्याप रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले नाही. ही सगळी परिस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे अधिवेशन मुंबईत घेण्याचे ठरवल्याचे सूत्रांनी सांगितले.