किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनांदेड, [१६ फेब्रुवारी] – महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड या प्रतिष्ठेच्या विधानसभा जागेवर भाजपाने आज सोमवारी दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपाचे उमेदवार तुषार राठोड यांनी आपल्या वडिलांचा हा मतदारसंघ कायम राखला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुखेड मतदारसंघात भाजपाचे गोविंद राठोड ७३ हजाराच्या विक्रमी मतांनी विजयी झाले होते. मात्र, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक घेणे अनिवार्य झाले होते.
भाजपाने गोविंद राठोड यांचे पुत्र तुषार राठोड यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये तुषार राठोड यांनी कॉंग्रेसचे उमेदवार हनुमंत बेटमोगरेकर यांचा ४७ हजार २४८ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपाचा पराभव करण्यासाठी त्यांनी या मतदारसंघात अनेक सभांसह मुक्कामही केला होता. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्यानेच आपला विजय झाल्याचे डॉ. तुषार राठोड यांनी आपल्या विजयावर प्रतिक्रिया देताना संगितले.