किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 30 %
वायू वेग : 2.56 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.84°से. - 30.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल=पाटणा हायकोर्टाचे मांझींना आदेश=
पाटणा, [१६ फेब्रुवारी] – बिहारमध्ये राजकीय अस्थिरता कायम असतानाच, पाटणा उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना आर्थिक परिणामकारक ठरतील, असे कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेण्याचे आदेश दिले आहेत. मांझी यांच्यासाठी हा मोठा धक्काच मानला जात आहे.
मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही केवळ तुमचे दैनंदिन कार्य करू शकता. पण, आर्थिक आणि धोरणात्मक असे कुठलेही निर्णय तुम्हाला घेता येणार नाही, असे न्या. इक्बाल अहमद अन्सारी आणि न्या. समरेंद्र प्रताप सिंग यांच्या खंडपीठाने जदयु आमदार नीरज कुमार यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट केले.
येत्या २० तारखेला मांझी आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करणार आहेत, हे विशेष! न्यायालयाने मुख्यमंत्री मांझी यांच्यासोबतच राज्याचे मुख्य सचिव, राज्यपालांचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांनाही अशाच प्रकारचे निर्देश दिले आहेत.
मांझी सरकारकडे बहुमत नसल्याने त्यांना आर्थिक परिणामकारक ठरू शकतील, असे कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील आणि राज्याचे माजी महाधिवक्ता पी. के. शाही यांनी केला. मांझी सरकारने अलीकडील काळात घेतलेल्या काही निर्णयांकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आणि उत्तरप्रदेशातील जगदंबिका पाल सरकारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हवाला दिला.