किमान तापमान : 28.28° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 54 %
वायू वेग : 4.66 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.63°से. - 29.74°से.
शनिवार, 15 मार्च27.42°से. - 29.94°से.
रविवार, 16 मार्च26.88°से. - 29.16°से.
सोमवार, 17 मार्च26.74°से. - 29.04°से.
मंगळवार, 18 मार्च26.35°से. - 28.24°से.
बुधवार, 19 मार्च26.22°से. - 29.04°से.
गुरुवार, 20 मार्चलामजना, [१९ डिसेंबर] – लातूर – उस्मानाबाद जिल्हयांतील सीमेवरील किल्लारीसह लामजना, खरोसा, मंगरूळ, गुबाळ,लिंबाळा बाणेगावसह परिसरातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९.४२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.
भूकंपाच्या भीतीने आणि घरातील भांडयांच्या आवाजामुळे घरांतील लोक रस्त्यावर धावत आले,सर्वत्र धावपळ सुरू झाली. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाक्षी संपर्क साधला असता, भूकंप मापक यंत्रावर नोंद झाली नसल्यामुळे हा भूकंप नसून गूढ आवाज असल्याचे उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले.
दरम्यान, उमरगा तालुक्यातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. प्रांरभी जमिनीतून आवाज येत पत्रे हादरल्याचे जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. या संदर्भात तहसीलदार उत्तमराव सबनीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचे सांगितले.