किमान तापमान : 27.32° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=केरळातही ‘घर वापसी’=
अलपुझा, [२२ डिसेंबर] – विश्व हिंदू परिषदेच्या ‘घर वापसी’ अभियानांतर्गत रविवारी केरळातील अलपुझा जिल्ह्यात ३० ख्रिश्चन नागरिकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चेप्पाडच्या कनिचनल्लोर येथील देवळात धर्मांतरणाचा हा सोहळा शांततेत पार पडला.
आधी हे नागरिक हिंदूच होते. आमिष दाखवून आणि बळजबरी करून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते. आज पुन्हा आपल्या धर्मात परत आल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया या नागरिकांनी दिली. विशेष म्हणजे, ज्या कुटुंबातील नागरिकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यात आले, त्यांचे नातेवाईक व मित्रवार यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होता.
या नागरिकांवर आम्ही कोणतीही जबरदस्ती केली आहे किंवा त्यांना आर्थिक प्रलोभनही दाखविले नाही. त्यांनी स्वेच्छेने हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला आहे, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे चेनगन्नू विभागाचे अध्यक्ष प्रताप पडिकल यांनी केला आहे. या भागातील आणखी सुमारे दीडशे कुटुंबांना हिंदू धर्मात यायचे आहे. येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात ‘घर वापसी’ अभियान राबविण्यात येणार असल्याचे पडिकल यांनी सांगितले.