किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=४३ ते ४७ जागा मिळण्याची शक्यता : जनमत चाचणीचा निष्कर्ष=
नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत आणि जम्मू-काश्मिरात दुसरा मोठा पक्ष म्हणून भाजपाचा उदय होणार असल्याचे भाकीत सर्वच जनमत चाचण्यांनी केल्यानंतर, पुढील वर्षी राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाच ४३ ते ४७ जागा जिंकून स्वबळावर सत्तेवर येणार असल्याचा निष्कर्ष एका ताज्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. तथापि, मुख्यमंत्रिपदासाठी अजूनही आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनाच पसंती असल्याचे यात दिसून आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने अलीकडेच हे सर्वेक्षण केले आहे. यात ७० सदस्यीय दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४३ ते ४७ जागा मिळतील, असा अंदाज आहे तर, केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला २२ ते २५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. कॉंगे्रस पक्ष याहीवेळी दुहेरी आकडा गाठू शकणार नाही. या पक्षाला ३ ते ५ जागा मिळतील, असे सध्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकल्या होत्या. भाजपाला एकूण ४६ टक्के मते मिळाली होती. मतांची ही टक्केवारी विधानसभा निवडणुकीतही भाजपा कायम ठेवणार असल्याचा अंदाज आहे.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ३१ जागा मिळाल्या होत्या तर, आम आदमी पार्टीला २८ आणि कॉंगे्रसला केवळ ८ जागा मिळाल्या होत्या. बहुमत नसल्याने भाजपाने सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर केजरीवाल यांनी कॉंगे्रसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. तथापि, केंद्रात ‘किंगमेकर’ होण्याचे स्वप्न उराळी बाळगून त्यांनी अवघ्या ४९ दिवसातच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीतही त्यांचा आणि पक्षाचा दारुण पराभव झाला होता.
सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दिल्लीकरांचे मत जाणून घेण्यात आले असता, ४२ टक्के लोकांनी केजरीवाल यांना पसंती दिली तर, त्यांच्या खालोखाल ३८ टक्के लोकांनी भाजपा नेते डॉ. हर्षवर्धन यांना पसंती दिली. बहुतांश लोकांचे असे मत आहे की, दिल्ली निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची भूमिका असेल आणि त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपाला मिळेल.