किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=नववर्षात करणार प्रवेश=
नाशिक, [२३ डिसेंबर] – राज ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या ‘चापलुसी’ नेत्यांंच्या व्यवहाराला कंटाळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार माजी आमदार भाजपाच्या वाटेवर निघाले असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या मनसेला हा फार मोठा धक्काच राहणार आहे.
मनसेच्या या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी विरोध दर्शविला आहे. तथापि, प्रदेश भाजपाने या सर्वांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी आमदार व पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्राने दिली.
लोकसभेपाठोपाठच राज्य विधानसभा निवडणुकीतही मनसेचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून आली होती. राज ठाकरे यांच्या अतिशय जवळचे असलेले अविनाश अभ्यंकर व बाळा नांदगावकर यांच्या विरोधात काही पराभूत उमेदवारांनी तक्रारी केल्या होत्या. त्याकडे राज ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि अनेक पदाधिकार्यांनी राजीनामास्त्र उपसले होते. राज ठाकरे यांनीही आपल्याच भोवतातील लोकांना प्राधान्य देत पक्ष स्थापनेत मोलाचा वाटा उचलणार्या या पदाधिकार्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही माजी आमदार व पदाधिकारी पक्षापासून दूर गेले. त्यात प्रामुख्याने नाशिक आणि मुंबईतील पदाधिकार्यांचा समावेश आहे.
संघटन कौशल्यात निष्णात असलेल्या या चारही माजी आमदार व पदाधिकार्यांना भाजपाने जवळ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनीही भाजपात येण्याची इच्छा वर्तविली आहे. त्यामुळे आता केवळ प्रवेशाची औपचारिकताच तेवढी शिल्लक आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत या चौघांचा प्रवेश सोहळा होणार आहे.