किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=श्रीश्री रविशंकर यांची मागणी=
नाशिक, [१४ जानेवारी] – यावर्षी येथे होणारा कुंभमेळा पाहता तत्पूर्वी स्थानिक जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याबाबत योग्य ती पावले उचलण्याची मागणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांनी केली आहे.
नाशिक मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना श्रीश्रींनी मंगळवारी ही मागणी केली. या कार्यक्रमाला महापौर अशोक मुर्तडक, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक गणमान्य उपस्थित होते. पवित्र समजण्यात येणार्या या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो नागरिक येथे येणार असून ते सर्व गोेदावरी नदीत पवित्र डुबकीसुद्धा लावतील. पण सध्या गोदावरी नदीची अवस्था पाहता नदीत आंघोळ करणारे लोक आपल्याबरोबर अनेक आजार घेऊन जातील, अशी भीतीसुद्धा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
गोदावरीसह कपिला व नासार्डी या नद्यांनासुद्धा जिल्हा प्रशासनासह मनपा व अन्य स्थानिक संस्था व रहिवाशांनी युद्ध पातळीवर स्वच्छ करण्याची गरज आहेच. याशिवाय या नद्यांमध्ये सांडपाणी जाणार नाही, यासाठीही पावले उचलणे आवश्यक असल्याकडे कार्यक्रमाला उपस्थितांचे लक्ष वेधले.