किमान तापमान : 25.08° से.
कमाल तापमान : 28.35° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 7.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.35° से.
23.36°से. - 29.99°से.
सोमवार, 03 फेब्रुवारी टूटे हुए बादल24.35°से. - 25.94°से.
मंगळवार, 04 फेब्रुवारी छितरे हुए बादल23.23°से. - 25.23°से.
बुधवार, 05 फेब्रुवारी टूटे हुए बादल23.49°से. - 26.16°से.
गुरुवार, 06 फेब्रुवारी साफ आकाश24.05°से. - 26.36°से.
शुक्रवार, 07 फेब्रुवारी साफ आकाश24.65°से. - 26.99°से.
शनिवार, 08 फेब्रुवारी साफ आकाश=शिवाजी सहाणे विजयी, जयंत जाधवांची आमदारकी जाणार=
नाशिक, [१३ जानेवारी] – विधान परिषदेसाठी नाशकातून तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवाजी सहाणे आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जयंत जाधव यांना समसमान मते मिळाली होती. त्यानंतर ईश्वरचिठ्ठीने निकाल जाहीर करण्यात आला होता.
ईश्वरचिठ्ठीत राष्ट्रवादीचे जाधव यांना आमदारकी मिळाली होती. या निवडणुकीत चार मते बाद ठरली होती. ही मते आपलीच असल्याचा दावा सहाणे यांनी केला होता आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने नुकताच सहाणे यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले आहे. या निकालामुळे जयंत जाधव यांची आमदारकी जाणार आहे.