किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनाशिक, (२०सप्टेंबर) – नाशिक येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पृष्ठभूमीवर महापालिकेने तयारी सुरू केली आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे २०२५ मध्ये कुंभमेळा होणार आहे. प्रयागराजमध्ये करण्यात येणार्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी नियोजन करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेच्या सिंहस्थ नियोजन बैठकीत घेण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन होते. या काळात शाही स्नानाची पर्वणी असते. संपूर्ण देशभरातून तसेच परदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी मोठे नियोजन केले जाते. प्रयागराजमध्ये २०२५ मध्ये होणार्या कुंभमेळ्यासाठी कशाप्रकारे नियोजन करण्यात येत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेचे एक पथक पाठविण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर नाशिकमधील गोदाघाटाचा विकास केला जाणार आहे. त्यात घाट विकास, प्रदूषणमुक्त गोदावरी, मलनिस्सारण केंद्राचे सक्षमीकरण केले जाणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तो राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.