किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-राहुल नार्वेकर यांची स्पष्ट भूमिका,
मुंबई, (२०सप्टेंबर) – आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यांवर निर्णय घेण्यात विलंब करण्याची माझी मुळीच इच्छा नाही, पण कुणावर अन्याय होईल, असा घाईचा निर्णयही मी घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशद केली. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी कालावधी निश्चित करण्याचा आदेश अध्यक्षांना दिला होता. यानंतर नार्वेकर यांनी आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे, याची मला माहिती नाही.
एक मात्र खरे की, कुणावरही अन्याय होणार नाही, असाच निर्णय मी घेणार आहे आणि त्यासाठी घाई करून चालणार नाही, असे नार्वेकर म्हणाले. यापूर्वीच्या सुनावणीत आदेश देऊनही विधानसभा अध्यक्षांनी अद्याप काहीच केले नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेर्यांकडे लक्ष वेधले असता, कायदा आणि घटनात्मक तरतुदी अंतर्गत शक्य तितक्या लवकर मी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मला प्राप्त व्हायची आहे. त्यामुळे न्यायालयात नेमके काय घडले, याची मला माहिती नाही. निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतरच मी त्यावर प्रतिकि‘या देऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
Short URL : https://vrittabharati.in/?p=55309