किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.43° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=निवडणुकीचा शंखनाद, मतमोजणी १० फेब्रुवारीला=
नवी दिल्ली, [१२ जानेवारी] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेची निवडणूक ७ फेब्रुवारीला तर मतमोजणी १० फेब्रुवारीला होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत केली. निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली.
७० सदस्यीय दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना संक्रातीच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला जारी केली जाणार आहे. २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील, २२ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याचे संपत यांनी पत्रपरिषदेत सांगितले. २४ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत आहे. शनिवार, ७ फेब्रुवारीला मतदान होईल, तर मंगळवार १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याचे संपत यांनी जाहीर केले. १२ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेतील १२ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीत या निवडणुकीसाठी ११७६३ मतदानकेंद्र राहणार असून १ कोटी ३० लाख ८५ हजार २५१ मतदार मताधिकार बजावणार असल्याचे संपत यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याबरोबरच दिल्लीत तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली असल्याचे संपत यांनी स्पष्ट केले. मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेडची तसेच प्रसाधनगृहाची व्यवस्था राहाणार आहे. अपंग व्यक्तींसाठी मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे याठिकाणी रॅम्पची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे संपत यांनी सांगितले.
निवडणुका खुल्या आणि नि:ष्पक्ष वातावरणात होण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदारांसाठी इव्हीएमवर नोटाचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. नवी दिल्ली आणि कॅण्टॉनमेंट या दोन मतदारसंघात व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर केला जाणार असल्याचे संपत यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, त्याचप्रमाणे निवडणुकीतील खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी आयोगातर्फे निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे, याकडे लक्ष वेधत संपत म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचारातील प्रत्येक मोठ्या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा आणि डॉ. नसीम झैदी उपस्थित होते.