किमान तापमान : 28.14° से.
कमाल तापमान : 28.43° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.14° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा=
मुंबई, [१२ जानेवारी] – सामाजिक बांधिलकी जपून, व्यसनमुक्ती सारख्या अभियानासह विविध समाज जागृतीच्या कार्यात युवकांचे सहकार्य व योगदान लाभावे यासाठी विवेकानंद युवा मित्र योजना राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी येथे दिली. तालुका स्तरावर तीन हजार तर जिल्हा स्तरावर पाच हजार रुपये मानधन या युवा मित्रांना मिळेल तर, ही नेमणूक एका वर्षासाठी असेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये एक तरुण व तरुणीची नियुक्ती युवा, युवती मित्र म्हणून केली जाईल. युवकांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून उत्साह निर्माण करण्याचे काम विवेकानंद युवामित्र योजनेतून होईल. या नेमणुका राजकीय स्वरूपाच्या नसल्या तरी सामाजिक संघटनेत काम करणार्या तरुणांना प्राधान्य मिळेल. त्यांनी करावयाच्या कामांची निवड आदीबाबतचे नियम तयार झाले असून, येत्या महिन्या दीड महिन्यात त्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू होईल, असेही तावडे म्हणाले.
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केवळ सरकारी नियम करून होणार नाही, तर लोकचळवळी मधूनच ते साध्य होईल, उद्योगधंद्यांसाठी मराठी येणे हे अनिवार्य वाटेल अशी जाणीव उद्योजकांना होईल तेव्हा राजभाषा, ज्ञानभाषा होण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही तावडे यावेळी म्हणाले.
कॉल सेंटर मधून जाणार्या दहा पैकी आठ फोनला उत्तर देणार्यांनी जर असे म्हटले की तुम्ही मराठीत बोलणार असाल तरच तुमचे म्हणणे मी ऐकून घेईन, तर तिथे काम करणार्या अमराठी मुला-मुलींनाही मराठी शिकणे भाग पडेल. त्या सेवा घेणारे उद्योजकही म्हणतील की मराठी येणार्यांनाच कॉल सेंटरमध्ये नोकरीला ठेवा! आपोआप मराठीचा प्रसार आणि प्रचार होईल. तालुका न्यायलयांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करता येईल का यासाठी आम्ही देशाच्या मुख्य सचिवांशी पत्रव्यवहार करणार आहोत. कायद्याचे शिक्षण मुळात मराठीतून झाले व मराठीतून शिकलेल्या वकिलांनाही व्यवसायाची संधी तालुका जिल्हा न्यायालयात मिळत असेल,तर मराठीचा विकासही साध्य होईल, असेही तावडे म्हणाले.