किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 29.49° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.49° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशबडोदा, [१२ जानेवारी] – येत्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वागत करण्यासाठी भारत देश सज्ज झाला असतानाच, अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या मकरसंक्रातीनिमित्त आकाशात झेपावण्यासाठी मोदी आणि ओबामा पतंगही सज्ज झाले आहेत.
प्रामुख्याने गुजरातच्या बडोदा, सूरत, भरूच, राजकोट, अहमदाबाद आणि राज्यातील अन्य शहरांमधील बाजारपेठा मोदी आणि ओबामांचे छायाचित्र असलेल्या पतंगांनीच सजल्या आहेत. या दोन्ही पतंगांना गुजरातमध्ये प्रचंड मागणी होत आहे, अशी माहिती बडोदा पतंग विक्री आणि मालकी असोसिएशनचे सचिव मेहमूद कुभानभाई पतंगवाला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
यावर्षी राज्यभरातील बाजारांमध्ये वेगवेगळ्या पतंगी आल्या आहेत. तथापि, मोदी आणि ओबामा यांचे छायाचित्र असलेल्या पतंगांना प्रचंड मागणी आहे. या पतंगांमुळे यावर्षी व्यवसायात बरीच वाढ झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
मूळचे भारतीय असलेले पण, सध्या कॅनडात वास्तव्यास असलेले कश्यप वैद्य हे संक्रातीच्या पतंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. मला पतंगांचा प्रचंड शौक आहे. पण, कॅनडात पतंग उडत नसल्याने दरवर्षी मी येथे येत असतो, असे त्यांनी सांगितले.