|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.99° से.

कमाल तापमान : 28.18° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 61 %

वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.99° से.

हवामानाचा अंदाज

26.99°से. - 30.14°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

28.06°से. - 30.88°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.63°से. - 31.01°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

27.09°से. - 29.92°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.35°से. - 30.07°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.17°से. - 29.52°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

दिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

=शीला दीक्षित-अजय माकन यांच्यात जुंपली=
dixit-makenनवी दिल्ली, [१४ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच कॉंग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून, ज्येष्ठ नेत्या व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि कॉंग्रेस सरचिटणीस व विधानसभा निवडणुकीसाठी गठित प्रचार समितीचे प्रमुख अजय माकन यांनी एकमेकांवर जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.त्यामुळे गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिसर्‍या स्थानावर राहिलेल्या कॉंग्रेसचे या निवडणुकीतील भवितव्यही आणखी अंध:कारमय होण्याची शक्यता बळावली आहे.
कधीकाळी सोनिया गांधी यांच्या निकटवर्ती असलेल्या आणि तब्बल १५ वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या शीला दीक्षित यांचे पक्षश्रेष्ठींशी आता पाहिजे तेवढे सौहार्दपूर्ण संबंध राहिलेले नाही. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर दिल्लीत कॉंग्रेस आम आदमी पार्टीला पाठिंबा देईल, अशी घोषणा करून शीला दीक्षित यांनी आधीच अडचणीत असलेल्या कॉंग्रेसच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसश्रेष्ठींच्याही नाराजीचा सामना त्यांना करावा लागला. शीला दीक्षित यांच्या या विधानापासून कॉंग्रेसने स्वत:ला दूर ठेवले. एवढेच नव्हे तर दीक्षित यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा निर्णयही कॉंग्रेसश्रेष्ठींनी घेतला. उमेदवारीपासून शीला दीक्षित यांच्या समर्थकांना वंचित ठेवण्यात आले.
मात्र, यानंतरही शीला दीक्षित यांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही. अजय माकन यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा अनाहूत सल्ला देत शीला दीक्षित यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली. नवी दिल्ली हा आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शीला दीक्षित यांचा सामना अरविंद केजरीवाल यांच्याशी झाला. सलग तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषवणार्‍या शीला दीक्षित यांना केजरीवालांकडून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाने शीला दीक्षित यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपली. नाही म्हणायला संपुआ सरकारने त्यांना केरळचे राज्यपाल म्हणून पाठवले. मात्र, केंद्रात नवे सरकार आल्यानंतर त्यांना राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला.
या निवडणुकीत कॉंग्रेसला मदत करण्याऐवजी शीला दीक्षित यांनी आपल्या विधानाने अडचणीत आणण्याची भूमिका घेतली. त्यामुळे कॉंग्रेसने दीक्षित यांचे पक्षांतर्गत विरोधक अजय माकन यांना विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. एकप्रकारे अजय माकन यांच्या नेतृत्वात दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला. त्यामुळे अजय माकन यांना अडचणीत आणण्यासाठी शीला दीक्षित यांनी माकन यांना नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची सूचना केली. मात्र, सदर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माकन यांची इच्छा आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवली तर माकन आपल्यासारखेच पराभूत होतील आणि त्यांची राजकीय कारकीर्दही संपेल, अशी या सूचनेमागची शीला दीक्षित यांची भूमिका असू शकते.
याबाबत पत्रपरिषदेत विचारले असता माकन यांनी प्रत्येक युगाची सुरुवात होते व अंतही होतो, असे सूचक विधान करत शीला दीक्षित यांचे युग दिल्लीच्या राजकारणातून संपले असल्याचे स्पष्ट केले. दीक्षित या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, त्यांनी या वेळी निवडणूक लढण्यास नकार दिला, निवडणुकीच्या राजकारणातून त्या निवृत्त झाल्या, या शब्दात माकन यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पक्षश्रेष्ठी आता शीला दीक्षित यांच्या बोलण्यावर बंधन आणतात की अनिर्बंध होऊन त्या कॉंग्रेसला आणखी अडचणीत आणतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Posted by : | on : 15 Jan 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g