किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=दिल्ली विधानसभा निवडणूक=
लखनौ, [१५ जानेवारी] – बहुजन समाज पक्ष आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व ७० जागा लढणार असल्याची घोषणा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली असून, निवडणुकीच्या प्रचारालाही प्रारंभ केला आहे.
बसपा या निवडणुकीत सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे आणि गुरुवारपासूनच पक्षाचा प्रचारही सुरू झाला आहे, असे मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मायावती यांनी गुरुवारी आपला ५९ वा वाढदिवस जनकल्याण दिन म्हणून साजरा केला. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवून भाजपाने जनतेची दिशाभूल केली. मात्र, आता भाजपा व केंद्र सरकार दिल्लीतील जनतेची दिशाभूल करू शकणार नाही, असेही मायावती यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मायावती यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही खरपूस टीका केली. दलित व मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीत केजरीवाल एक पाऊल पुढे गेले आणि आरक्षणच संपुष्टात आणण्यासंबंधीची विधाने त्यांनी केली व त्यांचे मतही असेच असल्याचे मायावती म्हणाल्या. भाजपा आणि आपच्या राजवटीत गरीब मुस्लिमांसह अल्पसंख्यक व सवर्णांमधील गरिबांना शिक्षण आणि नोकर्यांमध्ये योग्य स्थान मिळणार नाही, असा आरोपही मायावती यांनी केला.