किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.95°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=अकृषक परवानगी मिळाल्यानंतर नियोजन करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश=
मुंबई, [१५ जानेवारी] – औद्योगिक वापराकरिता अकृषक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षांच्या आत उद्योग उभारणे बंधनकारक राहील आणि जमिनीचा गैरवापर होणार नाही याचे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी येथे दिले.
‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’साठी करायच्या उपाययोजनांचा आढावा सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्यासह विविध विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक वापराकरिता अकृषक परवानगी मोठ्या प्रमाणावर घेण्यात येतात. मात्र, या जागांवर तातडीने उद्योग उभारले जात नाहीत. अकृषक परवाना मिळाल्यानंतर पाच वर्षात उद्योग उभारावा. त्यानंतर पाच वर्षांपर्यंत विलंब झाल्यास संबंधितांकडून दंड वसूल करावा व त्यानंतरही उद्योग उभा न राहिल्यास सदर जमीन शेतकर्याला परत करावी किंवा इतर उद्योजकांना ती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले तर, उद्योग सुरू करताना अनेक ना-हरकत प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. यातील कालबाह्य ठरलेली प्रमाणपत्रे न मागितल्यास विशेष फरक पडेल का, यावर अभ्यास करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काही राज्यात वृक्षतोड परवानगी कमी कालावधीत देण्यात येते. मात्र, यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षतोड प्राधिकरणाकडे हे प्रकरण जाते व त्यासाठी सुमारे ९० दिवस एवढा कालावधी लागतो. हा वेळ कमी करता यावा, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. जागतिक बँकेच्या मानांकनानुसार महाराष्ट्र सध्या १४२ व्या क्रमांकावर आहे. येत्या वर्षभरात ५० व्या क्रमांकावर आणण्यासाठी केंद्राने मेक इन इंडियासाठी दिलेला ९८ कलमी अजेंडा मे २०१५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे राज्याच्या वतीने केंद्राला आश्वासन दिले आहे, असे मुख्य सचिव क्षत्रीय यांनी यावेळी सांगितले.