किमान तापमान : 27.25° से.
कमाल तापमान : 27.77° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.25° से.
26.99°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=स्वतंत्र अधिसूचना न निघाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी अडचणीत=
मुंबई, [१६ जानेवारी] – ३० जानेवारी रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीची स्वतंत्र अधिसूचना न निघाल्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कोंडी झाली आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ आणि तांत्रिक बाबी तपासल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ पाहता कॉंग्रेस पक्षाचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याने कॉंग्रेस या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे आशीष शेलार आणि विद्यमान शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे विधानसभेत निवडून गेले आहेत. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर विधान परिषदेत निवडून गेलेले आणि विधानसभा निवडणुकीत भाजपामध्ये प्रवेश केल्याने विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. यापैकी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विनायक मेटे यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ जुलै २०१६ मध्ये संपणार होता व विनोद तावड़े यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० तर आशीष शेलार यांचा जुलै २०१८ मध्ये संपणार होता. त्यामुळे आशीष शेलार आणि विनोद तावड़े यांच्या जागेसाठी स्वतंत्र निवडणूक होणार आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि विनायक मेटे यांच्या जागेसाठी एकत्रच अधिसूचना निघावी, अशी कॉंग्रेसची अपेक्षा होती. मात्र, चारही जागेसाठी स्वतंत्र अधिसूचना निघाल्याने चार जागांवर स्वतंत्र निवडणूक होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना निवडून येण्यासाठी सभागृहाच्या संख्याबळानुसार १४४ मतांची आवश्यकता आहे. या तुलनेत भाजपा आणि शिवसेना आमदारांचे संख्याबळ व अपक्ष आमदारांचा पाठिंबा पाहता सत्ताधारी पक्षाकडे १९५ इतके संख्याबळ आहे. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रित आले तरी ते १०० चा आकड़ा पार करू शकत नाहीत.
पृथ्वीराज चव्हाण आणि विनायक मेटे यांच्या जागेसाठी एकत्रच निवडणूक अधिसूचना निघाली असती, तर एका उमेदवाराला ९६ च्या जवळपास मतसंख्या आवश्यक होती. परंतु, असे न झाल्याने कॉंग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. त्यामुळे या संदर्भात कॉंग्रेस निवडणूक आयोगकडे पत्र पाठवून अधिसूचनेसंदर्भात विचारणा करणार असून, संख्याबळाच्या तांत्रिक बाबी तपासून निवडणुकीच्या उमेदवारी बाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. यावरून सभागृहाचे संख्याबळ पाहता कॉंग्रेस पक्ष या विधान परिषद निवडणुकीत माघार घेण्याची चिन्हे दिसत आहेत.