किमान तापमान : 29.14° से.
कमाल तापमान : 29.43° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 1.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.14° से.
27.97°से. - 29.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=आपचे राजकारण नकारात्मक : किरण बेदी यांची भूमिका=
नवी दिल्ली, [१६ जानेवारी] – पक्षाने आदेश दिला तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात लढण्यास आपण तयार आहोत, अशी भूमिका भाजपा नेत्या आणि भारतीय पोलिस सेवेतील पहिल्या महिला अधिकारी किरण बेदी यांनी आज शुक्रवारी स्पष्ट केली. केजरीवाल यांचे राजकारण नकारात्मक स्वरूपाचे आहे, असा आरोप त्यांनी केला.
राजकारणात आपण कधीच जाणार नाही, अशी माझी भूमिका कधीच नव्हती. याबाबत आम आदमी पार्टी दिशाभूल करणारे वक्तव्य करीत आहे. आपल्या आवडीनुसार समोर जाण्याचे माझे सर्वच पर्याय खुले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मी प्रभावित झाले आहे, असे किरण बेदी यांनी सांगितले. आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, असे विचारले असता, याबाबतचा निर्णय पक्षच घेणार आहे. पक्ष सांगेल, तिथूनच मी लढणार आहे. मी केजरीवाल यांच्याविरोधात लढावे, असा आदेश मला जर पक्षाने दिला, तर मी त्या आदेशाचेही पालन करेन. माझ्या क्षमतेवर भाजपाला पूर्ण विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.
केजरीवाल यांच्याकडून सकारात्मक राजकारणाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. सत्तेसाठी त्यांनी मूळ अजेंडा बाजूला ठेवला आणि नकारात्मक राजकारणाकडे वळले आहेत. ते स्वत:ला आम आदमींचा पक्ष समजत असले, तरी प्रत्यक्षात तसे काहीच नाही, अशी टीकाही बेदी यांनी केली.