किमान तापमान : 29.34° से.
कमाल तापमान : 29.77° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 5.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.77° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल=किरण बेदींचे प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत=
नवी दिल्ली, [१६ जानेवारी] – माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांनीही आज शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे आपमध्ये अस्वस्थता पसरली आहे तर, दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
शाजिया इल्मी यांनी शुक्रवारी दुपारी प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपाचे दिल्ली प्रभारी खा. प्रभात झा आणि प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने मी प्रभावित झाले होते, त्यामुळे भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मी पक्षाकडे काहीही मागितले नाही. पक्षाने सांगितले तर निवडणुकीच्या रिंगणात उतरेन, असे इल्मी यांनी स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल यांना मी नेता मानले होते. मात्र, माझा भ्रमनिरास झाला, असे इल्मी यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांच्या विरोधात भाजपा इल्मी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी भाजपात प्रवेश केलेल्या किरण बेदी यांचे आज शुक्रवारी प्रदेश भाजपा कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बेदी यांनी जोशपूर्ण भाषण करून उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांची मने जिंकली. दिल्लीच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे बेदी यांनी सांगितले. किरण बेदींना भाजपाने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले नसले तरी दिल्लीच्या विकासासाठी आपला कार्यक्रम काय राहणार, हे किरण बेदी यांनी जाहीर केले. यावेळी बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. किरण बेदी यांच्याकडे प्रदेश निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची घोषणा सोमवार १९ जानेवारीला होण्याची शक्यता आहे. त्यादिवशी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून भाजपा उमेदवारांच्या यादीला अंतिम रूप दिले जाणार आहे. प्रदेश निवडणूक समितीने विधानसभेच्या ७० जागांसाठी २५० संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. भाजपाकडे ९०० पेक्षा जास्त जणांनी उमेदवारीची मागणी केली होती. प्रदेश निवडणूक समितीची उद्या शनिवारी आणखी एक बैठक होणार असून, त्यात संभाव्य उमेदवारांची यादी १५० वर आणली जाणार आहे.