किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 31.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 6.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.69° से.
27.3°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल=अमित शाह यांनी केली घोषणा=
नवी दिल्ली, [१९ जानेवारी] – दिल्ली विधानसभेची निवडणूक भारतातील पहिल्या महिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या नेतृत्वात लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने सोमवारी रात्री घेतला.
भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी एका पत्रपरिषदेत ही घोषणा केली. किरण बेदी याच भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेदी यांच्या नेतृत्वात भाजपाला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वासही शाह यांनी यावेळी व्यक्त केला. किरण बेदी या कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील, असे स्पष्ट करीत शाह म्हणाले की, किरण बेदींच्या नावावर पक्षात कोणतेही मतभेद नव्हते, त्यांच्या संदर्भातील निर्णय एकमताने घेण्यात आला.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत दिल्लीतील ७० जागांचे उमेदवारही निश्चित करण्यात आले, असे स्पष्ट करीत शाह म्हणाले की, ही निवडणूक भाजपा आपला मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाला सोबत घेऊन लढणार आहे. किरण बेदी यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांच्या विरोधात संघर्ष केला आहे. पोलिस खघत्यातील निवृत्तीनंतर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्या दिल्लीतील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करतील, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.