किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=१४ दिवसांचा फर्लो मंजूर=
पुणे, [२४ डिसेंबर] – मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत बेकायदेशीरपणे शस्त्र जवळ बाळगल्याबद्दल पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याची १४ दिवसांची संचित रजा (फर्लो) कारागृह प्रशासनाने मंजूर केली असून, आज बुधवारी सकाळीच तो कारागृहातून बाहेर पडल्यानंतर मुंबईत पोाोचला.
यामुळे कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत करण्याची संधी संजय दत्तला मिळाली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला संजय दत्तने फर्लोसाठी अर्ज केला होता. या अर्जात त्याने नेमके कोणते कारण दिले, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. तथापि, संपूर्ण चौकशी करून प्रशासनाने मंगळवारी त्याची सुटी मंजूर केली. त्यानंतर त्याने आवश्यक कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली. बुधवारी सकाळी तो कारागृहातून बाहेर आला आणि आपल्या कारने मुंबई गाठली.
संचित रजा प्राप्त करण्यासाठी त्याने ४ डिसेंबर रोजी अर्ज केला होता. त्यावेळी आमिर खानच्या ‘पीके’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्याला रजा हवी असल्याची चर्चा होती. पीके चित्रपटातत संजय दत्तनेही काम केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने त्याला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सुरुवातीच्या काळात तो दीड वर्षे कारागृहात राहिला असल्याने आता त्याला केवळ साडेतीन वर्षांचीच शिक्षा भोगायची आहे. १६ मे २०१३ रोजी संजय दत्तची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. साडेतीन महिन्यानंतर म्हणजे ३० सप्टेंबर २०१३ रोजी संजयला १४ दिवसांची संचित रजा मंजूर झाली. पायाच्या दुखापतीमुळे ती रजा महिनाभर वाढविण्यात आली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संजय दत्त पुन्हा येरवड्यात गेला. मात्र, दीड महिन्यात पुन्हा महिन्याभराचा पॅरोल मंजूर करण्यात आला. यावेळी पत्नी मान्यताची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देण्यात आले होते. २१ डिसेंबरला बाहेर आलेल्या संजयला यानंतर सलग दोनवेळा दोन महिने पॅरोल रजा वाढवून देण्यात आली.