किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलन्यूयॉर्क, [२५ डिसेंबर] – सरत्या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेली ‘गूगल’ची ‘ड्रायव्हरलेस’ अर्थात चालकविरहित कार नव्या वर्षात बाजारपेठेत धडकणार आहे. इंटरनेटवरील आघाडीचे सर्च इंजिन असणार्या ‘गूगल’ने गेल्या दोन दिवसात या अनोख्या कारची छायाचित्रे विविध संकेतस्थळांवर पोस्ट केली आहेत. त्यानुसार ही कार साधारणपणे गोलाकार असणार आहे. पुढील वर्षी साधारणतः मे महिन्यात ही कार बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षाच्या सुरुवातीला ही कार इंग्लंडच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. मात्र, त्याआधी या गाडीच्या आणखी काही चाचण्या केल्या जाणार असल्याचे ‘गूगल’ने स्पष्ट केले आहे. याच वर्षीच्या मे महिन्यात गूगलने या कारचे प्रारूप जगापुढे आणले होते. तोपर्यंत चालकाशिवाय चालू शकणारी गाडी ही केवळ कल्पनाच होती. मात्र, प्रारूप आणि आताच्या कारमध्ये बरेच मूलभूत फरक करण्यात आले असून त्यात ‘सेल्फ ड्राइव्ह’ उपकरणांचा भरपूर वापर करण्यात आला आहे.
त्यात सेन्सर आणि मध्यवर्ती कम्प्युटरचा समावेश असून सध्या अशी सुविधा केवळ लेक्ससच्या एसयूव्ही आणि टोयोटाच्या ‘प्रियस’ या गाड्यांमध्येच उपलब्ध आहे. याशिवाय, या गाडीत सेल्फ ड्रायव्हिंगसाठी उपयुक्त‘लेझर स्टिअरिंग’चा समावेश आहे. कंपनी पहिल्या टप्प्यात अशा १०० गाड्या बाजारात आणेल. या गाड्यांमध्ये स्टिअरिंग नसून त्याऐवजी ‘स्टॉप’ आणि ‘गो’ अशी दोन बटने आहेत. शिवाय, दिशादर्शन करण्यासाठी जीपीएस, सेन्सर आणि कॅमेरा डेटाची सोय आहे. गूगलच्या या प्रकल्पाचा प्रमुख ख्रिस उमर्सन याने या गाडीचे उत्पादन करून विक्री करण्यात ‘गूगल’ला रस नसल्याचे म्हटले आहे. या गाडीत बसून फक्त फिरण्याचा आनंद घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचे स्टिअरिंग नाही की पेडल नाही. काहीच न करता आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य आणि आनंद खूप महत्त्वाचा आहे, असे मत ‘गूगल’चे सहसंस्थापक सर्जी ब्रिन यांनी व्यक्त केले.