किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=झारखंडमध्ये प्रचार केलेल्या आठपैकी सात ठिकाणी पराभव=
रांची, [२५ डिसेंबर] – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशके देशावर राज्य करणार्या कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पराभवाची मालिका अखंडपणे सुरूच असून, नुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रचार केलेल्या आठपैकी सात मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला.
पाच टप्प्यात पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रचार केलेल्या आठही जागी कॉंग्रेसचा पराभव होईल, असे भाकीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले होते आणि मंगळवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये शाह यांचे हे भाकीत जवळपास खरे ठरले. राहुल गांधी यांनी पाचपैकी चार टप्प्यांमध्ये प्रचार केला. भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी यांच्या सभेला तुरळक गर्दी होती. या सभांसाठी गर्दी जमविण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस कार्यकर्त्यांना बराच घाम गाळावा लागला. कांके येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी सध्या लोकांना भेडसावत असलेल्या समस्या आणि त्या कशा सोडविणार हे सांगण्याऐवजी कॉंग्रेसप्रणीत संपुआच्या केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांचे गुणगान करणे सुरू करताच अनेकांनी काढता पाय घेतला. राहुल गांधी यांनी प्रचार केलेल्या मनिका, चाईबासा, जगन्नाथपूर, शिकारीपारा व महागामा या मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष दुसर्या स्थानावरही राहू शकला नाही.