किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकोट्टायम, [२५ डिसेंबर] – विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने देशात सुरू असलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांतर्गत केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील दोन मंदिरांमध्ये ५८ ख्रिश्चनांनी हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला.
गुरूवारी पोनकुन्नाम येथील पुथियाकावू मंदिरात झालेल्या एका समारंभात २० ख्रिश्नच कुटुंबातील ४२ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला तर, तिरुनाकारा येथील तिरुनाकारा श्रीकृष्ण स्वामी मंदिरात पार पडलेल्या समारंभात १६ जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला, असे विहिंपचे जिल्हाध्यक्ष बालचंद्रन पिल्लई यांनी सांगितले. यावेळी धर्मांतरण करणार्यांपैकी एक जण मुस्लिम असल्याचेही सांगितले जात आहे. धर्मांतर करून हिंदू धर्मात आलेले सर्वजण व्हायकोम, कुमारक्कम व कांजिरापल्ली येथील आहेत व कोणतेही आमिष न दाखविता त्यांनी स्वत:हून धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पिल्लई यांनी सांगितले.
अशाचप्रकारचे कार्यक्रम इतरही काही ठिकाणी आयोजित करण्यात आले. अलाप्पुझा जिल्ह्यातील कयामाकुलम येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात ११ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. त्यापूर्वी गेल्या २१ डिसेंबरला अनुसूचित जातीच्या आठ कुटुंबातील ३० ख्रिश्चनांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. सध्यातरी यामध्ये सरकारी हस्तक्षेपाची गरज नाही, असे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.