किमान तापमान : 28.28° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.66 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.63°से. - 29.74°से.
शनिवार, 15 मार्च27.42°से. - 29.94°से.
रविवार, 16 मार्च26.88°से. - 29.16°से.
सोमवार, 17 मार्च26.74°से. - 29.04°से.
मंगळवार, 18 मार्च26.35°से. - 28.24°से.
बुधवार, 19 मार्च26.22°से. - 29.04°से.
गुरुवार, 20 मार्च=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती=
परळी, [१२ डिसेंबर] – दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता होणार आहे.
के्रंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाधिस्थळ परळी तालुक्यातील पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर परिसरात आहे. याचठिकाणी गोपीनाथगड स्मारक उभारले जाणार आहे. यावेळी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज व राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरात ३०बाय ५० फुटांचे आणि ४०० बाय ५०० फूट आकाराचे मंडप उभारण्यात आले आहेत.
कार्यक्रमाला राज्यभरातील कार्यकर्त्यांची गर्दी होणार असल्याने परळी – बीड मार्गावरील पांगरी येथून जाणार्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. दसर्याला भगवानगड, तर बारा डिसेंबरला गोपीनाथगडावर दरवर्षी भगवानबाबांचे भक्त व गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांचा मेळावा होणार असल्याने गोपीनाथगडाला विशेष महत्व येणार आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी सायंकाळी समाधिस्थळी पाहणी केली.