किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.95°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, [१३ डिसेंबर] – पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होत असलेल्या राजधानी दिल्लीत भाजपा स्पष्ट बहुमत प्राप्त करून सत्तेवर येणार असल्याचे एका ताज्या जनमत चाचणीत दिसून आले आहे. गेल्या निवडणुकीत २८ जागा जिंकणार्या आम आदमी पार्टीला यावेळी केवळ १७ जागांवर आणि कॉंगे्रसला ७ ते ८ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
एबीपी न्यूज-नील्सनने गेल्या आठवड्यात दिल्लीकरांच्या मनातला कौल जाणून घेतला आहे. दिल्लीत भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे यात स्पष्ट झाले असले, तरी मुख्यमंत्री म्हणून दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनाच आपली पहिली पसंती दिली आहे. ४३ टक्के मतदारांनी केजरीवाल मुख्यमंत्री असावे, असे मत व्यक्त केले आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना ३९ टक्के लोकांनी या पदासाठी पसंती दिली आहे.
७० सदस्यीय विधानसभेत कॉंगे्रसची स्थिती गेल्या वर्षीप्रमाणेच राहणार असल्याचे या दिल्लीतील ३५ मतदारसंघात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. यात सहभागी झालेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाच स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाविषयी माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला. ७४ टक्के मतदारांनी ‘अतिशय चांगले’ अशा शब्दात मोदी यांच्या कामांना पसंती दिली. सर्वात आवडते नेते म्हणूनही ५८ टक्के लोकांनी मोदी यांनाच पसंती दिली असून, ३३ टक्के लोकांनी केजरीवालांच्या नावावर मोहर उमटवली आहे.