किमान तापमान : 28° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 3.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28° से.
27.93°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.1°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल=राजनाथसिंह यांची ग्वाही=
नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – राजधानीत एका बहुराष्ट्रीय कंपनीतील युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने अनेक प्रभावी उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज राज्यसभेत एका निवेदनातून दिली.
या मुद्यावर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी लोकसभेत निवेदन केले होते. आज राज्यसभेत निवेदन करताना राजनाथसिंह म्हणाले की, वेबसाईटच्या माध्यमातून संचालित केल्या जाणार्या टॅक्सीसेवेवर बंदी घालण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना तसेच केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे जोपर्यंत नोंदणी केली जात नाही तोपर्यंत कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात टॅक्सीची वाहतूक करण्यालाही परवानगी देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. संबंधित घटनेत उबेर टॅक्सीसेवेची कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू असून राजधानी दिल्ली क्षेत्रात या सेवेच्या टॅक्सीवाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.
बलात्काराच्या घटना टाळण्यासाठी आमच्या सरकारने आतापर्यंत अनेक प्रभावी उपाययोजना केल्या आहेत, याकडे लक्ष वेधत राजनाथसिंह म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांकडून काही दिरंगाई झाली का याची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून तिला आपला अहवाल सादर करण्यासाठी २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल. अशा प्रकरणांची सुनावणी तातडीने करण्यासाठी देशात २१२ फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात आले आहे. यातील १२ फास्ट ट्रॅक कोर्ट दिल्ली क्षेत्रात आहेत, असे स्पष्ट करत राजनाथसिंह म्हणाले की, पोलिस नियंत्रण कक्षाच्या सूचनेची वाट न पाहता गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहोचण्याचे निर्देश गस्तीवरील वाहनांना दिले जातील.
अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांची कायमस्वरूपी नोंद ठेवण्यासाठी सेंटर डाटाबँक स्थापन करण्याच्या प्रस्तावावर काम सुरू आहे. गस्त घालणार्या वाहनांची संख्या ३७० वरून एक हजारपर्यंत वाढवण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या मुद्यावरून आनंद शर्मा, सतीश मिश्रा, नरेश अग्रवाल, के. सी. त्यागी, रामदास आठवले, विजय गोयल, डी. राजा, रजनी पाटील, राजीव शुक्ला यांच्यासह अनेक सदस्यांनी सूचना केल्या.