किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.74° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.74° से.
22.37°से. - 25.6°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
बुधवार, 15 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल25.3°से. - 27.1°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=शेतकर्यांची अत्यल्प उपस्थिती • युवा कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ=
नागपूर, [८ डिसेंबर] – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शेतकर्यांच्या हिताच्या गोष्टी करणार्या कॉंग्रेसने सोमवारी विधानसभेवर काढलेला ‘हल्लाबोल’ मोर्चा पूर्णत: फसला. शेतकर्यांचे हित साधण्याचा आव आणणार्या कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा फारच कमी लोक जमवता आल्याने त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. कॉंग्रेसला इतके वाईट दिवस का आले? असा प्रश्न पोलिसांना देखील पडला होता.
चार दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी वार्तापरिषद घेऊन मोर्चात ५० हजार लोक सहभागी होतील अशी घोषणा केली होती. त्यामुळे पोलिसांनी देखील या मोर्चाची गंभीरतेने दखल घेतली होती. मोर्चा ‘भव्य’ राहणार असल्याने पोलिसांनी या मोर्चासाठी एक पॉईंट राखून ठेेवला होता. या पॉईंटवर अन्य मोर्चांना परवानगी देण्यात आली नव्हती. सकाळी ११ वाजता दीक्षाभूमी येथून हा मार्चा निघणार होता. परंतु, ११ वाजेपर्यंत कुणीही नेते आणि कार्यकर्ते दीक्षाभूमीकडे फिरकले नव्हते. जेमतेम ५०-६० लोक आले होते आणि ते चहाच्या टपर्यांवर इतस्तत: विखुरले होते. त्यामुळे मोर्चा आहे की नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. दुपारी १२ वाजेनंतर हळूहळू कार्यकर्ते जमायला लागले. दुपारी साडेबाराच्या सुमारास माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी दीक्षाभूमीवर आले. मोर्चेकर्यांची अत्यल्प उपस्थिती पाहून सर्व नेत्यांचे चेहरे पार काळवंडले होते. सर्वजण ऐकमेकांना धीर देत ‘आर्वीचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. काळजी करू नका’, असे हे नेते आपसात बोलत होते.
दुपारी दीडच्या सुमारास दीक्षाभूमी येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यावेळी एक हजाराच्या जवळपास लोक मोर्चात होते. मोर्चा बोले पेट्रोलपंपाजवळ आला असताना आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली शेतकर्यांची दिंडी या मोर्चात सहभागी झाली. त्यामुळे मोर्चेकर्यांची थोडीफार संख्या वाढली. शहरातील विविध मार्गाने फिरून हा मोर्चा मॉरिस कॉलेज पॉईंटवर आला असता पोलिसांनी मोर्चेकर्यांना अडविले. त्यावेळी फारतर दोन-अडीच हजार लोक उपस्थित होते.
कापसाला ७ हजार रुपये भाव देण्यात यावा, धान, सोयाबिन आणि उसाला योग्य भाव देण्यात यावा, एलबीटी बंद करण्यात यावा, आत्महत्या करणार्या शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, कर्जमाफी करण्यात यावी, अवकाळी पाऊस लक्षात घेता दुष्काळ घोषित करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दीक्षाभूमी येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.
यावेळी झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे यांची भाषणे झाली. अगोदरच मोर्चाची अवस्था पाहून लालबुंद झालेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी महायुती सरकारवर आगपाखड केली. राज्यात दुष्काळी स्थिती असताना मुख्यमंत्री दिल्लीची वारी करतात. शेतकर्यांच्या मागण्या पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही असा निर्धार या नेत्यांनी यावेळी केला. त्यानंतर एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन केले.
मोर्चात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नदीम खान, शिवाजीराव मोघे, राजेंद्र मुळक, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, वर्षा गायकवाड, अनिस अहमद, आमदार अमित देशमुख, अमर काळे, वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नीलेश राणे, माजी आमदार अशोक धवड, अभिजित वंजारी, नागपूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षा सुनीता गावंडे, नाना गावंडे, माजी खासदार गेव्ह आवारी, विकास ठाकरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.