किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलपॅरिस, [६ डिसेंबर] – फ्रान्समधील अभियंत्यांनी वीज तयार करणारे एक कृत्रिम झाड तयार करण्यात यश मिळवले आहे. हे झाड हवेचा उपयोग करून वीजनिर्मिती करेल. या ‘विंड ट्री’बाबत माहिती देताना जेरोम मिचौड लेरिविरे यांनी सांगितले की, हवा नसतानासुद्धा झाडाची पाने हलताना पाहिल्यानंतर असे झाड बनवण्याची कल्पना आपल्याला सूचली. हे विंड ट्री बनवून त्याची पुढील वर्षी बाजारात विक्री करण्याची आपली योजना असून निर्माण होणारी ऊर्जा वॉटमध्ये परिवर्तित केली जाईल.
या झाडाची पानं म्हणजे छोटे छोटे पंखे असून वाहणार्या हवेतून ते वीजनिर्मिती करतील, असे सांगून लेरिविरे म्हणाले की, अभियंत्यांच्या चमूला तीन वर्षे संशोधन केल्यानंतर हे विंड ट्री बनवण्यात यश आले आहे.
पारंपरिक विंड टर्बाईनच्या रूपात असलेले २६ फूट उंचीचे हे झाड ४.५ मैल प्रतितास वेगाने वारे वाहिल्यास दिवसातून दोन वेळा वीजनिर्मिती करू शकेल. सध्या असे एक झाड फ्रान्समधील ब्रिटनी शहरात लावण्यात आले आहे. विंड ट्रीच्या विक्रीनंतर नागरिक आपल्या घरी ते लावून त्याचा उपयोग करू शकतील, असा विश्वास या चमूने व्यक्त केला आहे.
मात्र हे हायटेक विंड ट्री अतिशय महाग असून त्याची किंमत २३,५५ पौड म्हणजे २३ लाख रुपये आहे.