किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– केंद्रीय संचार ब्युरो आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन,
नागपूर, (०१ नोव्हेंबर) – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय —सीबीसी, नागपूर आणि रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित ’सरदार पटेल – राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार’ दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी रामटेक येथील विद्यापीठ परिसरात आयोजन करण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.कृष्णकुमार पांडे आणि सीबीसी, नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे यांची उपस्थिती राहणार आहे.
या छायाचित्र प्रदर्शनात सरदार पटेल यांच्या जीवनाशी संबंधित दुर्मिळ चित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत निशुल्क: पाहण्यास खुले राहणार आहे. विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्यांनी तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे यांनी केले आहे.