किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.34° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.72 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.85°से. - 27.41°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल25.27°से. - 27.79°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.16°से. - 28.5°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.9°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.58°से. - 28.05°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.41°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल– ठाकरे, पवारांची एक दोन जागांवर होणार बोळवण,
मुंबई, (०२ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीच्या या पृष्ठभूमीवर महाविकास आघाडीच्या जागवाटपासंदर्भातला फार्म्युला आता चर्चेत आला आहे. विदर्भात सर्वाधिक जागा कंग्रेस स्वतःच लढेल आणि ठाकरे, पवारांची एक दोन जागांवर बोळवण होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
पूर्व विदर्भात सहा लोकसभा मतदार संघ आहेत. यातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक या पाच मतदारसंघावर काँग्रेस निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायचा. मात्र अजित पवार यांनी २ जुलै रोजी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्यास शरद पवार गट तयार झाला आहे. तर शिवसेना ठाकरे गटालाही एकनाथ शिंदे आणि काही आमदारांच्या बंडखोरीमुळे फटका बसला आहे. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे परंपरेने आपल्याकडे असणारा रामटेक मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्यास ठाकरे गटही तयार आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघ परंपरेने काँग्रेसकडे आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने वर्ध्यासाठी आग्रह धरल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या मोबदल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने वर्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसही वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रावीद शरद पवार गटाला देण्याची शक्यता आहे.
* पश्चिम विदर्भातील जागावाटप जवळपास निश्चित
महाविकास आघाडीच्या बैठकीत पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदार संघातील जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम या दोन मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाने आग‘ह धरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंजूरीनंतर हे दोन्ही मतदारसंघ ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष जवळपास महाविकास आघाडीमध्ये जवळ जवळ सामील झाल्याची चिन्ह आहे. त्यामुळे अकोल मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची शक्यता आहे.
* विदर्भात महाविकास आघाडीचा असा असेल फॉर्मुला
विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सहा जागांवर काँग्रेस, दोन मतदारसंघावर ठाकरे गट, तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी प्रत्येकी एका जागेवर लढण्याची शक्यता आहे.