किमान तापमान : 25.66° से.
कमाल तापमान : 27° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.8 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.66° से.
24.59°से. - 27.86°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.31°से. - 28.55°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.68°से. - 29.16°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.99°से. - 29.58°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.16°से. - 28.88°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.62°से. - 29.11°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र,
अहमदनगर, (०३ फेब्रुवारी) – आपण गेल्या १६ नोव्हेंबरलाच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देऊनच आपण सभेला गेलो. अडीच महिने शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की, राजीनाम्याची वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. ”मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलतायत. काल एक जण बडबला की, भुजबळच्या कमरेत लात घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. १७ नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको,’ असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही २७ तारखेला मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. दाव पर सबकुछ लगा है, रुक नही सकते, टूट सकते है, लेकिन झुक नही सकते, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. मराठा आमदारांना मत मिळणार नाही. म्हणून ते घाबरत आहेत. आमचे लोक रॅलीला येत नाही. पण, मदत ही करत नाही. मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते. गावागावात ओबीसींना त्रास दिला जातो. तक्रार होत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.