किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल,
नाशिक, (०२ फेब्रुवारी) – मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे मराठा समाजाला असा कोणता विजय मिळाला, मराठा समाजाला नेमके काय मिळाले, कशाचा विजय साजरा करण्यात आला, असे सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केले.
ते येथे पत्रपरिषदेत बोलत होते. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, त्याबाबत विचारले असता, त्यांनी परखड मत मांडले. मनोज जरांगे यांची मी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. हे होणार नाही. हा तांत्रिक व कायदेशीर पेच आहे. हा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल. मग हाच प्रश्न प्रत्येक राज्यात उभा राहील. विशेष अधिवेशन घ्यावे लागेल. सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. हे इतके सोपे नाही, असे मी तेव्हाच सांगितले होते.
याआधी मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढले होते. राज्यभर मोर्चे निघाले. आता पुन्हा तेच झाले. वस्तुस्थिती आपण पाहणार की नाही, कोणाच्या तरी राजकीय अजेंड्याखाली आपण हे सगळे करत आहोत, याचा विचार मराठा बांधवांनीही करायला हवा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्तकेली.
नवी मुंबईत मुख्यमंत्री जरांगेंना भेटले, आंदोलन मागे घेतले गेले. विजयोत्सव साजरा झाला. कशाचा विजय झाला? नेमके काय मिळाले असा कोणता विजय मिळाला आणि जर विजय झाला आहे तर, पुन्हा उपोषण करण्याची गरज काय आहे, असे प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
माझा टोलला विरोध नाही…
टोलला माझा विरोध नाही. ही पद्धत जगभर असते. टोलवसुलीच्या पद्धतीला माझा विरोध आहे. त्यात पारदर्शकता नाही, हा माझा मुद्दा आहे. कोणाच्या खिशात पैसे जातात, सरकारला ते पैसे जातात का, त्या पैशातून आम्हाला सुविधा मिळतात का, हे सगळं समजत नसेल तर, टोलला विरोध का करू नये, अशी विचारणाही राज ठाकरे यांनी केली.