|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.22° से.

कमाल तापमान : 30.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 35 %

वायू वेग : 2.56 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.99° से.

हवामानाचा अंदाज

23.84°से. - 30.99°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.33°से. - 27.74°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.61°से. - 28.54°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.91°से. - 28.49°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.02°से. - 28.97°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.45°से. - 28.82°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
Home »

अमित शहांना भेटण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत

अमित शहांना भेटण्यासाठी राज ठाकरे दिल्लीतनवी दिल्ली, (१९ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने अनेक राज्यांमध्ये जागा वाटप केल्या आहेत, मात्र महाराष्ट्रात अद्याप करार झालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत. ते भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज ठाकरे हे दिल्लीतील एका खाजगी हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर राज ठाकरे गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला पोहचले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री...19 Mar 2024 / No Comment / Read More »

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणा

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणानवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणुकीसोबत निवडणूक आयोगाने आज सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांतील विधानसभेच्या ४१४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली. १७५ सदस्यांच्या आंध्रप्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासोबत म्हणजे १३ मेला मतदान घेतले जाणार आहे. ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे १९ एप्रिलला मतदान होईल. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेसाठीही १९ एप्रिललाच निवडणूक होणार आहे. १४७ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेसाठी १३ मे,...17 Mar 2024 / No Comment / Read More »

भाजपची दुसरी यादी जाहीर; नागपुरातून गडकरी, चंद्रपूरातून मुनगंटीवार, बीडमधून पंकजा मुंडे

भाजपची दुसरी यादी जाहीर; नागपुरातून गडकरी, चंद्रपूरातून मुनगंटीवार, बीडमधून पंकजा मुंडेनवी दिल्ली, (१३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसर्‍या यादीत नितीन गडकरी यांना नागपुरातून तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीत त्यांचे नाव नसताना त्यांच्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मनोहर लाल खट्टर यांना कर्नालमधून तिकीट मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा तत्पूर्वी, यादी अंतिम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी बैठक झाली. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,...13 Mar 2024 / No Comment / Read More »

वंचितला सहा जागा देण्यावरून मविआत मतभेद

वंचितला सहा जागा देण्यावरून मविआत मतभेद– पाच ते सहा जागांसाठी पवार, ठाकरे आग्रही, मुंबई, (९ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून, वंचितला किती जागा द्यायच्या, यावरून आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला किमान पाच ते सहा जागा मिळाव्या, असे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मत आहेत, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांची वंचितला फक्त तीन जागा देण्याची भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली....11 Mar 2024 / No Comment / Read More »

निवडणुकीदरम्यान हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही!

निवडणुकीदरम्यान हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही!– मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे प्रतिपादन, कोलकाता, (०५ मार्च) – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. निवडणुकीदरम्यान हिंसाचार रोखण्यासाठी निवडणूक आयोग सी व्हिजिल नावाचे अ‍ॅप्लिकेशन लॉन्च करणार आहे. राजीव कुमार म्हणाले की, राज्यात मुक्त, निष्पक्ष आणि हिंसाचारमुक्त निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे मुख्य...6 Mar 2024 / No Comment / Read More »

लोकसभा निवडणुकीच्या तारखा १४-१५ मार्चच्या आसपास जाहीर होणार?

लोकसभा निवडणुकीच्या तारखा १४-१५ मार्चच्या आसपास जाहीर होणार?नवी दिल्ली, (०५ मार्च) – लोकसभा निवडणुकीची पद्धत लवकरच जाहीर होऊ शकते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, १४-१५ मार्चच्या आसपास सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या निवडणूक आयोगाचे अधिकारी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अनेक राज्यांना भेटी देत आहेत. पश्चिम बंगालमधील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पूर्ण खंडपीठाने सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट...6 Mar 2024 / No Comment / Read More »

भाजपा नेते म्हणतात; मी मोदींचा परिवार

भाजपा नेते म्हणतात; मी मोदींचा परिवार– लालू यादव यांनी नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका, नवी दिल्ली, (०४ मार्च) – लोकसभा निवडणुकीपूर्वी कुटुंबवादाचा नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाने शनिवारी पाटणा येथील गांधी मैदानावर जनविश्वास रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत आई.एन.डी.आई.ए. महायुतीतील अनेक घटक पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. बिहारमधील जनतेला संबोधित करताना लालू यादव यांनी नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका केली आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत लालू यादव म्हणाले होते की, नरेंद्र मोदी...4 Mar 2024 / No Comment / Read More »

ओवेसींच्या विरुद्ध भाजपाने उतरवलेल्या माधवी लता कोण आहेत

ओवेसींच्या विरुद्ध भाजपाने उतरवलेल्या माधवी लता कोण आहेतहैदराबाद, (०३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काल भाजपाने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यावेळी भाजपाने तेलंगणातील प्रसिद्ध हैदराबाद मतदारसंघावर कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवर एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. हैदराबादची जागा १८८४ पासून ओवेसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. तो ओवेसींचा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून खासदार...3 Mar 2024 / No Comment / Read More »

भाजपाची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपाची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीरनवी दिल्ली, (०२ मार्च) – आगामी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे...2 Mar 2024 / No Comment / Read More »

हरियाणात भाजपा एकट्याने लढवणार लोकसभा निवडणूक

हरियाणात भाजपा एकट्याने लढवणार लोकसभा निवडणूकचंदीगड, (०१ मार्च) – हरियाणातील लोकसभेच्या दहा जागांवर भारतीय जनता पक्ष एकटाच लढू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या मॅरेथॉन बैठकीत या विषयावर चर्चा झाली. काल रात्री नवी दिल्लीत ही बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप हरियाणातील लोकसभेच्या सर्व १० जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. हरियाणा राज्य निवडणूक समितीने सर्व १० जागांसाठी उमेदवारांची नावे ठरवण्यासाठी एक पॅनल तयार केले आहे. हरियाणात भाजप आणि जेजेपी यांच्यात युती आहे. असे असतानाही भाजपने लोकसभा...1 Mar 2024 / No Comment / Read More »

सपा, आपमधील जागावाटपामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी

सपा, आपमधील जागावाटपामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी– अनेक प्रमुख नेत्यांना गमवावे लागले आपले मतदारसंघ, नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षासोबत, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये आम आदमी पक्षासोबत जागावाटपाचा समझोता करण्यात काँग्रेसला यश आले असले तरी, या जागावाटपावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. या जागावाटपात काँग्रेसला आपल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे मतदारसंघ सांभाळता आले नाही. या मतदारसंघाची आहुती आपल्या मित्रपक्षांना द्यावी लागली. गुजरातमध्ये काँग्रेसने भरुच आणि भावनगर अशा दोन जागा आपला दिल्या आहेत....25 Feb 2024 / No Comment / Read More »

भाजपाचा १०० दिवसांचा रोडमॅप तयार

भाजपाचा १०० दिवसांचा रोडमॅप तयार– लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपामध्ये बैठकांची मालिका सुरू, नवी दिल्ली, (२४ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपामध्ये बैठकांची मालिका सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वत:साठी ३७० आणि एनडीएला ४०० जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीत भाजपा आपले ध्येय गाठण्यासाठी रणनीती तयार करत आहे. लोकसभा निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींच्या शनिवारी झालेल्या बैठकीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व नेत्यांना पुढील १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करून बूथ स्तरापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना...24 Feb 2024 / No Comment / Read More »