किमान तापमान : 26.76° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 4.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
23.84°से. - 28.46°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 27.9°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.54°से. - 28.43°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.56°से. - 28.81°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.03°से. - 29.2°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.17°से. - 29.17°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल– अनेक प्रमुख नेत्यांना गमवावे लागले आपले मतदारसंघ,
नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षासोबत, तर दिल्ली आणि गुजरातमध्ये आम आदमी पक्षासोबत जागावाटपाचा समझोता करण्यात काँग्रेसला यश आले असले तरी, या जागावाटपावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. या जागावाटपात काँग्रेसला आपल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे मतदारसंघ सांभाळता आले नाही. या मतदारसंघाची आहुती आपल्या मित्रपक्षांना द्यावी लागली.
गुजरातमध्ये काँग्रेसने भरुच आणि भावनगर अशा दोन जागा आपला दिल्या आहेत. यातील भरुज हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार दिवंगत अहमद पटेल याचा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून अहमद पटेल तीनदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची यावेळी अहमद पटेल यांची कन्या मुमताज पटेल तसेच मुलगा फैझल अहमद यांची इच्छा होती. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र, हा मतदारसंघ आपकडे गेल्यामुळे मुमताज पटेल आणि फैझल अहमत नाराज झाले आहे. हा मतदारसंघ आम्हाला राखता आला नाही, याबाबत मुमताज पटेल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे.
अशीच स्थिती उत्तरप्रदेशातील फर्रुखाबादची आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचा हा मतदारसंघ आहे. १९९१ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत खुर्शीद या मतदारसंघातून विजयी झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. यावेळी पुन्हा खुर्शीद यांनी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र हा मतदारसंघत काँग्रेसने सपाला दिला आहे. त्यामुळे खुर्शीद नाराज झाले आहे. लखीमपूर खिरी, सीतापूर आणि लखनौ या तीन लोकसभा मतदारसंघातील स्थितीही अशीच आहे. हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेसने समाजवादी पक्षाला दिल्यामुळे येथून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असलेले काँग्रेस नेते नाराज झाले आहेत.