किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसर्या यादीत नितीन गडकरी यांना नागपुरातून तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीत त्यांचे नाव नसताना त्यांच्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. मनोहर लाल खट्टर यांना कर्नालमधून तिकीट मिळाले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा
तत्पूर्वी, यादी अंतिम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी बैठक झाली. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. पक्षाने आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणामधील तिकिटांवर चर्चा केली होती. बैठकीपूर्वी हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी राज्यातील दोन मित्रपक्षांमधील जागावाटपावर चर्चा केली होती.
पहिल्या यादीत मोदी, शहा यांच्यासह १९५ नावं
१ मार्च रोजी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी (वाराणसी), अमित शहा (गांधीनगर) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (लखनौ) यांच्या नावांचाही समावेश आहे. या यादीत ३४ केंद्रीय मंत्र्यांची नावे असून तीन मंत्र्यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. पक्षाच्या पहिल्या यादीत २८ महिला आणि ४७ तरुणांचा समावेश होता. तर २७ उमेदवार अनुसूचित जाती, १८ अनुसूचित जमाती आणि ५७ इतर मागासवर्गीय होते. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशातील २४, गुजरात आणि राजस्थानमधील १५-१५ जागा, केरळ आणि तेलंगणातील १२-१२ जागा, झारखंड, छत्तीसगड आणि आसाममधील ११-११ जागांचा समावेश आहे. त्याचवेळी दिल्लीतील पाच जागांसह इतर काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली.